✍️ पाण्याची Expiry Date काय असते.?


✍️ पाण्याची Expiry Date काय असते.?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/04/2026 :

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते, म्हणजे Expiry Date 1 दिवसाची.

जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे पाणी दिवसाआड Expire होते आणि ओतून दिले जाते.

जिथे आठ दिवसांनी पाणी येते, तिथे ते आठ दिवसांनी Expire होते.

लग्न व इतर मंगल, विधी कार्यात, पुढची बिस्लरी समोर आली की, हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली Expiry होते आणि फेकून दिली जाते.

वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही, तोपर्यंत जवळचे पाणी चालते.

धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते.

जर दुष्काळ परिस्थिती आली तर, दोन तीन वर्षे चालते.

जिथे ५० फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते, तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते, म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते. Expiry Date शेकडो वर्षे.

जिथे पाणी ४०० ते ५०० फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षा पूर्वी भूगर्भात साठलेले असते तरीही ते चालते.

एकूणच पाण्याची Expiry ही आपल्या कमकुवत बुद्धीमतेवर ठरवली जाते.

पाणी जपून वापरा, नाहीतर आपले विचारच आपला घात करतील.

     💧 जल है तो कल है 💧

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

      देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

  संकलन  : प्रविण सरवदे , कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या