मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/04/2026 :
आपल्या प्रत्येकाला आपली *कर्तव्ये* समजली पाहिजेत. त्यासाठी आपल्यातील कर्तव्यबुद्धी जागृत ठेवणे गरजेचे आहे. लहान असो वा प्रौढ, प्रत्येकाने आपले काम कामचुकारपणा न करता केलेच पाहिजे.
विद्यार्थी असेल तर मन लावून अभ्यास, गृहिणी असेल तर मनापासून घरातील काम, जी नोकरी, जो व्यवसाय असेल तो प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. मोबदला घेत असू तर नैतिकता जागृत ठेवलीच पाहिजे.
असे घडत नाही तेंव्हा वैयक्तिक, सामाजिक नीतिमूल्ये ढासळली जातात. सामाजिक घडी विस्कटते. कोणीच कोणाला जुमानत नाही. धाक किंवा आदर हा प्रकार रहात नाही, हे कोणाच्याच दृष्टीने योग्य नसते.
आजचा संकल्प
लहानपणापासून प्रामाणिकपणा व कर्तव्य बुद्धी वाढीस लागेल व ती पुढे सवयीची होईल यासाठी प्रयत्नशील राहू व स्वतःबरोबर समाज घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या