मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/04/2026 :

सध्या वर्तमानपत्रामधील बातम्या असोत वा दूरदर्शनवरील ठळक बातम्या, या बहुदा अपघातांच्या असतात. विमान पडले, बोट उलटली, आगगाडीचे डबे रुळावरून घसरले... यामध्ये सर्वात जास्त रस्ते अपघात असतात... समोरासमोर किंवा पाठीमागून धडक.

हे अपघात नैसर्गिक नाहीत, तर मानवनिर्मित आहेत. यांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा, अतिआत्मविश्वास, वेगावर नियंत्रण नसणे व नशेत गाडी चालवणे ही याची काही प्रमुख कारणे आहेत. थोडी काळजी घेतली, तर या गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात.

वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यानेसुद्धा अपघात होतात. आपण इतरांच्या मृत्यूचे कारण होऊ नये अशी प्रत्येकाने काळजी घेतली, तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.

 आजचा संकल्प

बेफिकीरपणे, अतिजलद गतीने वाहन चालवण्याचा मोह आवरता घेऊन स्वतःच्या व इतरांच्या जीवाची काळजी घेऊ व सुरक्षिततेचे नियम पाळून वाहन चालवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या