मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/04/2026 :

आपल्या प्रत्येकाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क हवा असतो. ज्याला ती भरपूर मिळते तो स्वतःला नशिबवान समजतो. हा वाडा आमच्या आजोबांनी बांधला, ही गाडी वडिलांनी घेतली. हे दागिने आज्जीचे आहेत हे अभिमानाने सांगतो.

प्रत्येकाचे नशीब असते तसे त्याला मिळते. हे सर्वांच्याच नशिबात नसते. काहीजण स्वतःच्या हिमतीवर कष्ट करून पोट भरतात. काही रहाण्यापुरते घर बांधतात तर काही याहीपेक्षा जास्त करतात.

खरे हे आहे की ही स्थावर संपत्ती नश्वर आहे. त्यापेक्षा संस्कार, शिक्षण महत्वाचे आहे. त्यातून तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजतो. स्वतःच्या प्रयत्नातून जगण्यासाठी जे हवे ते कमवता येते, आणि त्यामुळे त्याची किंमत पण समजते.

आजचा संकल्प

मुलांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना संस्कार देणे, शिक्षित करणे जास्त महत्वाचे हे लक्षात ठेवू व मुलांना सुसंस्कारित करून पुढील पिढी घडवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या