सहकार महर्षि अभियांत्रिकी मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी  मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  मॉक टेस्ट संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 09/04/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.टी.- सी.ई.टी.मॉक टेस्टचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन  एम.एच.टी.- सी.ई.टी.च्या परीक्षेची उजळणी, सॉफ्टवेअरची माहिती व त्याचबरोबर परीक्षेस कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभावे या उद्धेशाने करण्यात आलेले होते. या मथ्ये १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सदर मॉक टेस्ट करिता आयकॉन अकॅडमी अकलूज, चंदनकर अकॅडमी अकलूज, व्यवहारे  अकॅडमी अकलूज व संकेत अकॅडमी अकलूज या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या साठी  महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

या मॉक टेस्ट मुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना विद्यार्थ्यामधून होत आहे. तसेच ग्रामीण भागातील ‘नॅक अ’ मुल्यांकन प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय व महाविद्यालयामधील सुविधा पाहुन विद्यार्थ्यानी समाधान व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे  समन्वयक म्हणून प्रा. एस. एस. शिंदे व प्रा. एस. एस. पांढरे यांनी काम पाहिले असुन सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या