शेंडगेवाडी येथील स्वाती शरद सुळे हिची मुंबईतील सिफि टेक्नॉलॉजी कंपनीत निवड

शेंडगेवाडी येथील स्वाती शरद सुळे हिची मुंबईतील सिफि टेक्नॉलॉजी कंपनीत निवड 

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर तालुका प्रतिनिधी :  पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील स्वाती शरद सुळे हिची मुंबईतील सिफि टेक्नॉलॉजी कंपनीत निवड झाल्याबद्दल अकलूज वैभवचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार घालून, पेढे देऊन सत्कार करण्यात आला. भाळवणी, तालुका पंढरपूर येथील पत्रकार प्रशांत माळवदे यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी  माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, बागायतदार शरद सुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माळवदे, सौ.प्राची प्रशांत माळवदे,ओंकार प्रशांत माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाग्यवंत ल. नायकुडे यांनी स्वाती सुळे हिच्या भावी काळातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वाती सुळे हिचे प्राथमिक शिक्षण शेंडगेवाडी येथे झाले.तसेच माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी व इजिनिअरिंगचे शिक्षण शासकीय तंत्र निकेतन कराड येथे सुरू आहे.कॉलेज कॅम्पस मधून मुंबई येथे निवड झाली आहे. 

ही निवड झाल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे. यावेळी आभार ओंकार माळवदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या