पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर यांचा सुवर्ण-अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

 

पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर यांचा सुवर्ण-अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/04/2026 :

हिंदू वीरशैव लिंगायत समाजाचे वंदनीय पंचाचार्य जगद्गुरू रंभापुरी पीठाचे श्री.श्री.श्री.1008 वीरसिंहासनाधिश्वर प्रसन्न रेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन पीठाचे श्री.श्री.श्री.1008 सद्धर्मसिंहासनाधिश्वर सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे श्री.श्री.श्री.1008 सुर्यसिंहासनाधिश्वर डाॅ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, 

काशी पीठाचे श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि काशी पीठाचे श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी या पाचही जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत महोत्सव आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सव कार्यक्रम वेळापूरचे नुतन मठाधीपती श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

गुरुवार दिनांक-09.04.2026 रोजी ध्वजारोहण करून कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला. पहाटे गुरु गादीस रुद्राभिषेक संपन्न झाला. सकाळी 8.30 वाजता गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, दुपारी भजन-किर्तन व संगीत तसेच नवचंडी याग स्वाहाकार कार्यक्रम संपन्न होवून श्रीगुरूंच्या हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले. सायंकाळी श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे नाणेतुला, श्रीफळतुला, पेढातुला, दूधतुला, गहूतुला, साखरतुला, गुळतुला व तांदूळतुला संपन्न होवून श्रीगुरू हस्ते दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले. दिनांक-10.04.2026 व दिनांक-11.04.2026 रोजी वरील दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाले. तसेच दिनांक-10.04.2026 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक सद्भक्तांनी रक्तदान केले.

दिनांक-12.04.2026 रोजी सकाळी अय्याचार व शिवदिक्षा संस्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काशी पीठाचे श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात 275 शिष्यांनी शिवदिक्षा घेतली. सायंकाळी 7.00 वाजता पालखी मैदान - काळा मारूती मंदिर - व्यापारी पेठ - श्री बृहन्मठ वेळापूर या मार्गावरून पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी व शिवाचार्य मिरवणुक सोहळा संपन्न झाला. यावेळी कलश घेवून महिला सहभागी झाल्या होत्या. बार्शी येथील शिवलीलाताई पाटील यांच्या संस्थेचे विद्यार्थिनी यांनी मृदुंग वादन केले. सांगवी येथील रुद्रपशुपती कोळेकर महाराज शिवपाठ महिला मंडळ यांनी भजन व मृदुंग वादन केले. अकलूज येथील महात्मा बसवेश्वर बहूउद्देशिय संस्थेच्यावतीने ढोल-ताशा वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. सोलापूर व कर्नाटक येथील वीरभद्र मंडळी व ढोळ पथक मंडळी यांनी पारंपरिक नृत्य करत आपली कला सादर केली. यावेळी वैराग येथील विद्युत बग्गी व छत्री उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर रात्री 9.00 वाजता पंचाचार्य जगद्गुरू याचे दिव्यसानिध्यात धर्मसभा सुरू झाली. श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी वेळापूरकर यांनी श्री बृहन्मठ वेळापूरचा पूर्ण इतिहास व भविष्यातील संकल्प सांगितले यावेळी भविष्यात मठाच्या माध्यमातून वेद पाठशाळा, गोशाळा, योगशिबीर केंद्र, वृद्धाश्रम व अनाथाश्रमात निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर पंचाचार्य जगद्गुरू याचे आशिर्वचन संपन्न झाले त्यांनी श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना अमृत महोत्सव आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त मंगल आशिर्वाद दिले तसेच श्री बृहन्मठ वेळापूरचे नुतन मठाधीपती श्री.ष.ब्र.108 सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांना त्यांनी केलेले सर्व संकल्प लवकर पूर्ण व्हाव्यात असे शुभेच्छारूपी मंगलमय आशिर्वाद दिले. त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.यावेळी महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज्यातील बंधु-भगिनी यांचेसह भाविकभक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या शुभप्रसंगी काशी पीठाचे श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधिश्वर डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी निमार्ण केलेल्या "मार्ग हा मुक्तीचा" या ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या शुभहस्ते करण्यात आले...

दिनांक-13.04.2026 रोजी पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान संपन्न होवून सकाळी 11.00 वाजता पंचाचार्य जगद्गुरु तसेच, उपस्थित शिवाचार्य, संत-महंत, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मसभा सुरू होवून शिवाचार्य धर्मसंदेश आणि पंचाचार्य जगद्गुरूंचे प्रमुख आशिर्वचन झाल्यानंतर धर्मसभेची सांगता करण्यात आली. सायंकाळी श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची वेळापूर गावातून भव्य मिरवणुक कार्यक्रम संपन्न झाल्यावर महास्वामीजींची महाआरती संपन्न झाली... सदरच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध मठांचे अनेक शिवाचार्य यांची उपस्थितीत होती. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राजेवाडी श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन एन.शेषगिरीराव, सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील, बार्शी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष सौ.तेजस्विनी कथले, पुणे विश्वेश्वर बॅंकेचे माजी चेअरमन सुनिल  रूकारी, पुणे विश्वेश्वर बॅंकेचे संचालक अशोक  रूकारी, सोलापूर जि.प.सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, सोलापूर जि.प.सदस्य शिवानंद पाटील, वेळापूर ग्रामपंचायत सरपंच रजनिश कांबळे, वेळापूर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अमरसिंह माने-देशमुख, धानोर गावचे माजी सरपंच जीवन जानकर, सोलापूर हृदयम हॉस्पिटलचे डाॅ.शैलेश पाटील, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, वीरशैव लिंगायत समाज्यातील बंधु-भगिनी यांचेसह भाविकभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरू दर्शनाचा व भव्यदिव्य कार्यक्रमांचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या