"जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतः सोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करतात"

 "जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतः सोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करतात"

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/04/2026 :

तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेचं ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्या तेचं तर जाणार आहे. रडल्याने तर अश्रू सुध्दा परके होतात, हसल्याने परके सुध्दा आपले होतात. मला ती नाती आवडतात, ज्यात मी नाही आपण असतो.

लक्षात ठेवा, दहा चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करतांना अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपली जाते, पण सवयी कधीच सुटत नाहीत.

आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरू नका, कारण यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून असेल.

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे, की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

सुंदरता नसली तरी चालेल सोज्वळता असली पाहीजे. सुगंध नसला तरी चालेल दरवळ असायला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल आपुलकीचे बंधन असायला पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल तरी स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे.

एकच आयुष्य आहे, मेल्यावर काय होते माहीत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशीच दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल की मैत्री होते, आणि मनात शिरलं की प्रेम.

जिवंत असल्यावर तरी मेल्या सारखे जगू नका, आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. गेल्या नंतर फक्त आणि फक्त आठवणी शिवाय काही नाही. माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पने मागे धावतो. विशिष्ट प्रकारेच आंनद मिळायला हवा हा अट्टाहासच खरं तर दुःखाच कारण बनतो.

✍️ प्रा. एस. एम. पाटील

  देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

   संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या