सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक-शिक्षक मेळावा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/04/2026 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील पदवी इंजिनीरिंग विभागामध्ये महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५/०४/२०२६ रोजी पालक-शिक्षक मेळावा झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात प्रा.कोमल पोळ यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व सभेचा उद्देश सर्व पालकांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोकरे ए. जे. यांनी केले. त्यांनी विभागामध्ये वर्षभर चालणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील तसेच शैक्षणिक व्यतिरिक्त उपक्रमाबद्दलची माहिती पालकांना सांगितली. त्यांनी पदवी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अंतर्गत मूल्यमापन पद्धती तसेच शिस्तीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पालक सभेचे मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास, करिअरच्या संधी आणि शैक्षणिक गुणवत्ता यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी नियमितपणे महाविद्यालयाशी संपर्क ठेवावा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सभेदरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व शिस्तीबाबत विविध प्रश्न विचारले. संबंधित प्राध्यापकांनी समाधानकारक उत्तरे देऊन शंका निरसन केले. त्यामुळे पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली.
शेवटी प्रा. संगीतराव आर.पी. यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.पोळ के.ए. आणि प्रा. संगीतराव आर.पी. यांनी काम पाहिले.सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक-शिक्षक मेळावा संपन्न

0 टिप्पण्या