सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/04/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते प्रा.दिग्विजय जाधव व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा.दिग्विजय जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिक कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. भारती चंदनकर यांनी केले.

0 टिप्पण्या