भागवत जगताप यांचे वार्धक्याने निधन

 

भागवत जगताप यांचे वार्धक्याने निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/04/2026 :

चव्हाणवाडी - टेंभुर्णी (तालुका माढा जिल्हा सोलापूर) येथील तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व रहिवासी भागवत जगताप उर्फ भाऊ (वय 97 वर्षे )यांचे सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वार्धक्यातील अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात 2 मुले, 1मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये चव्हाणवाडी गावातील नागरिक "भाऊ" यांचा शब्द प्रमाण मानत. त्यांच्या निधनामुळे चव्हाणवाडी गावावर शोककळा पसरली आहे. प्रेमळ स्वभाव, सर्वांशी सुसंगत्व सत्य बोलणे यामुळे सर्वत्र अतिशय प्रिय होते. 

 त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व क्षेत्रातील आणि स्तरातील  मान्यवरांनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन शोक व्यक्त केला.

कै.भागवत जगताप यांचा तिसऱ्याचा विधी बुधवार दिनांक 08/04/2026 रोजी सकाळी होणार आहे.

टेंभुर्णी येथील वृत्तपत्र विक्रेते जनसेवा न्युज पेपर एजन्सी चे मालक ज्येष्ठ पत्रकार महादेव जगताप पत्रकार अनिल जगताप यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या