विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/04/2026 :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
डॉ. भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले की, भारताची राज्यघटना डोळ्यांपुढे येते. घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी जी समिती नेमली होती, तिचे अध्यक्षपद बाबासाहेबांकडे होते. त्यामुळेच *'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'* अशी त्यांची ओळख आहे.
जेव्हा जातीयभेद मोठ्या प्रमाणात पाळला जात होता, तेव्हा त्यांनी त्याही प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षित होऊन पुढील काळात अनेक पदव्या प्राप्त केल्या आणि अनेक सन्मान मिळवले. अज्ञानी समाजबांधवांना अंधश्रद्धा झुगारून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले.
मुलांनो, या थोर महापुरुषाची जयंती-पुण्यतिथी साजरी करताना, फक्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढणे इतकेच करू नका; तर त्यांच्या प्रतिभेचे पूजन करा. त्यांच्या गुणांचे अनुकरण करा आणि आपल्या वर्तनात बदल करा.
थोर व्यक्तींच्या विचारांचे अनुकरण करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या