विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/04/2026 :

आपले आत्ताचे वय आपल्याला अनेक नवीन गोष्टींचा अनुभव देते. शाळेत आपण अनेक विषयांचा अभ्यास करून आपले ज्ञान वाढवतो. त्याच वेळेस कुटुंबात आपल्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात. 

शाळेतील ज्ञान आपल्याला आपले करिअर बनवण्यासाठी उपयोगी पडते मात्र कुटुंबातून मिळालेले संस्कार आपल्याला माणूस म्हणून घडवते. एक संस्कारी व्यक्ती म्हणून समाजात आपली ओळख निर्माण होते.

आपल्यावर झालेले संस्कार आपण जतन करायचे असतात व पुढील पिढीला घडवायचे असते. तुमच्या पदवीच्या जोडीला तुमचे संस्कार तुमची खरी ओळख निर्माण करते.

शिक्षित मुले संस्कारांच्या माध्यमातून सुशिक्षित म्हणून ओळखली जातात.

सौ. स्नेहलता स. जगताप


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या