सोलापूरातील नेहरू वसतीगृहाचे बांधकाम पाडल्यास जिल्हा काँग्रेस आंदोलन करणार - सातलिंग शटगार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/04/2026 : सोलापूर शहरातील नेहरू वसतीगृहाचे बांधकाम पाडल्यास जिल्हा काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग आण्णाराव शटगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात द्वारे जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात सविस्तरपणे असे नमूद करण्यात आलेले आहे की, सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले नेहरू वस्तीगृह काही राजकीय हितचिंतकाच्या नजरेत भरून येत आहे. त्यामुळे ते पाडून तेथे मोठे व्यापारी संकुलन उभारण्याचे स्वप्न पाहत आहेत. अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी शहरात येऊन शिक्षण घेतात त्यांना राहण्यासाठी जागा नसते.अभ्यास करण्यासाठी जागा नासते .आशे विद्यार्थी या नेहरु वस्तीगृहाच्या ठिकाणी राहून शिक्षण घेत आसतात. व आज पर्यंत अनेक विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेतलेले आहे.या वस्तीगृहातील अनेक विद्यार्थी देशांमध्ये मोठमोठ्या मुद्द्यावर (पदावर) पोहोचलेले आहेत. आजही या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. थोडक्यात नेहरू वस्तीगृह म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मा आहे. या वस्तीगृहाचे कोणी पाडकाम करण्याचा प्रयत्न केलास देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील आजी-माजी विद्यार्थ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिला आहे. यापूर्वी 2007 मध्ये विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून वस्तीगृह पाडून तेथे शॉपिंग सेंटर बांधण्याचा डाव होता. तेव्हाही आजी-माजी विद्यार्थी व काही राजकीय पक्षांनी विरोध करून न्यायालयातून स्थगिती मिळवली होती. आजही आम्ही त्या मताशी ठाम असून जर वस्तीगृह पाडण्याचा विचार केलात तर सोलापूर जिल्ह्यातील या वस्तीगृहात शिक्षण घेतलेले आजी -माजी विद्यार्थी,पालक,त्यांच्या कुटुंबियासह शेतकरी बांधवांना घेऊन मोठे आंदोलन उभे करून हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा सातलिंग शटगार यांनी दिला आहे.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. अर्जुनराव पाटील, चिदानंद सुंटे, उपाध्यक्ष प्रा.सिद्राम सलवदे, मोतीराम चव्हाण, लक्ष्मण भोसले, सुरेश शिवपूजे, सुदर्शन आवताडे, असलम शेख, अकबर शेख, दत्तात्रय नामकर,आमिर शेख,मौलाली शेख, दत्तात्रय गजबार, विनोद रणसुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या