मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/04/2026 :
आपण एकटे कधीच नसतो. आपले जन्मदाते, सगेसोयरे, मित्रपरिवार, देशबांधव ते विश्वबंधव अशा नात्यांमध्ये आपण जीवन जगत असतो. त्यामुळे साहजिकच एकमेकांसाठी काही ना काही करत असतो.
कुटुंबात मोठे असलो तर भावंडांसाठी, नातलगांसाठी, थकलेल्या आई वडिलांसाठी, अडल्या-नडल्यांसाठी असे काही करतो. ते करत असताना कर्तव्य बुद्धीने करतो. त्यामधून आनंद व समाधान मिळते.
क्वचित प्रसंगी 'मी केले!' हा अहंकार जागा होतो. हे सारखे सारखे बोलले गेले तर ज्यांच्यासाठी केले ते उपकाराखाली दबून जातात व केलेले सर्व निरर्थक होते.
आजचा संकल्प
जीवनात आपल्यासाठीपण कोणीतरी काहीतरी केलेले असते. एकमेकांसाठी करत राहण्याचा वसा आनंदाने पुढील पिढीला देऊ व मागील पिढीशी कृतज्ञ राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या