🟩 महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे - सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे 🟦 भोसे गावात पूर्व परवानगी घेऊनच बसविण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

🟩 महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे - सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे 

🟦 भोसे गावात पूर्व परवानगी घेऊनच बसविण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर -(दि:-०६)पंढरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. काही ठिकाणी विनापरवानगी अति उत्साहात चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात. हे अत्यंत चुकीचे असून थोर महापुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाने मार्गदर्शक तत्वे जरी केले असून त्या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे. 

   दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी भोसे तालुका पंढरपूर या ठिकाणी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आरूड असलेला पुतळा भोसे येथील चौकात बसविण्यात आला होता. या पुतळ्यासाठी पूर्वपरवानगी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली गेली नव्हती या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन ,जिल्हा परिषद प्रशासन यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन तेथील सरपंच, पदाधिकारी जेष्ठ नागरिक तसेच युवक व ग्रामस्थ यांच्या याबाबत सोबत विविध चर्चा करण्यात आली. 

        पुतळा बसविल्यानंतर परवानगी बाबतची प्रक्रिया पार पाडावी असा गैरसमज निर्माण झाले असल्याचे प्रशासनाने तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले. भोसे गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन पुतळा स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी ठेवला.सदर पुतळा उभारण्यासाठी ग्रामस्थांनी रीतसर अर्ज केला असून, परवानगी मिळाल्यास  गाजत बसवावा. तसेच आवश्यक सुशोभीकरण करावे.भोसे ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पुतळा उभारणे बाबतचा आदर्श समोर ठेवला असून रीतसर परवानगी घेऊनच पुतळा उभारला जाणार आहे.

पुतळा उभारण्या बाबत योग्य मार्गदर्शनासाठी मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी प्रांताअधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचेही सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या