भागवत जगताप यांचे अकस्मात निधन; तालुकाध्यक्षांची सांत्वन पर भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/04/2026 :
चव्हाणवाडी - टेंभुर्णी (तालुका माढा जिल्हा सोलापूर) येथील तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व रहिवासी भागवत जगताप उर्फ भाऊ (वय 97 वर्षे )यांचे सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वार्धक्यातील अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले.
माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे आणि सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी शुक्रवार दिनांक 10/04/2026 रोजी सकाळी चव्हाणवाडी - टेंभुर्णी येथील निवासस्थानी जाऊन कै. भागवत उर्फ भाऊ जगताप यांचे पुत्र व टेंभुर्णी येथील वृत्तपत्र विक्रेते जनसेवा न्युज पेपर एजन्सी चे मालक ज्येष्ठ पत्रकार महादेव जगताप, पत्रकार अनिल जगताप यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नागरिक औदुंबर बाबू साळुंखे, प्रमोद अशोक कांबळे उपस्थित होते.

0 टिप्पण्या