मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/04/2026 :
स्त्री शक्ती हा फक्त बोलण्याचा विषय नाही तर स्त्रियांनी त्यांच्या शक्तीचा योग्य उपयोग करणे आणि पुरुषांनी त्यांना आपल्या बरोबरीने वागवणे हे महत्वाचे आहे.
स्त्री कुटुंबासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नाती सांभाळत असते. एकाच वेळेस अनेक भूमिका पार पाडत असताना सर्व ठिकाणी तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. तिला स्वतःचे असे तिचे स्थान असते.
तिला प्रोत्साहित करणे कुटुंबातील प्रत्येकाचे कर्तव्य असते. तिने स्वतःमधील न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. मात्र फाजील आत्मविश्वास धोकादायक असल्याने तो प्रमाणात ठेवला पाहिजे.
आजचा संकल्प
स्वतःच स्वतःचे भविष्य घडवण्यास समर्थ असणाऱ्या स्त्रिया कोणाकडे हात दाखवायला जाणार नाहीत किंवा मदतीसाठी हातही पसरणार नाहीत असे मनोमन ठरवू व स्वसन्मान जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप
=================

0 टिप्पण्या