विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/04/2026 :
सध्या आपण पाहतो सर्वत्र स्पर्धा दिसते. बक्षीस मला मिळाले पाहिजे, नंबर माझा आला पाहिजे त्यासाठी पळापळी. गाडी पकडायची असो वा लोकल, धावपळ करावीच लागते. त्यासाठी मानसिक ताण वाढतो. घड्याळाच्या काट्यावर पळावेथड लागते.
असे असले तरी ताण न घेता शिस्तबद्ध जीवन जगण्याची याच वयात सवय लावा. वेळेत अभ्यास केला की शाळेत शिक्षा होईल याची भीती रहात नाही. वेळेत उठलो तर शाळेत उशीर होत नाही. गोष्टी वेळच्या वेळी करण्याने तणावरहित जीवन जगता येते.
मुलांनो, स्वतःला व्यवस्थित सवयी लावल्या तर कसे होईल, काय होईल या चिंता रहात नाहीत. स्पर्धा इतरांशी करण्याऐवजी स्वतःशी करा. यामुळे तुमच्यात अपेक्षित व सकारात्मक बदल होईल.
तुम्हीच तुम्हाला घडवू शकता याची खात्री ठेवा.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या