नायकुडे 卐 रुपनर शुभ विवाह सोहळा संपन्न

 नायकुडे 卐 रुपनर शुभ विवाह सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/04/2026 : कै. मल्हारी दादा नायकुडे यांचे नातू व सौ वैशाली व श्री बाळकृष्ण मल्हारी नायकुडे राहणार मायाक्का कॉलनी, नायकुडे वस्ती, संग्रामनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव महादेव आणि कै. रामचंद्र नरू रुपनर यांची नात व श्रीमती उषा व कै परमेश्वर रामचंद्र रुपनर राहणार महूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां. सानिका यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 28/ 04/2026 रोजी दुपारी 12 : 24 वा. संपन्न झाला. या शुभ लग्न सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचा नायकुडे आणि रुपनर परिवाराच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

मातोश्री मंगल कार्यालय, अकलूज - शिवामृत रोड, चौंडेश्वरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज चे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे सह विविध क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या