⛴️ जगातील सर्वात मोठ्या जहाजाची अजब कहाणी ⛴️ 🔵 जे मुर्ख अस समजतात की नैसर्गिक द्रवरूप वायू आणंण हा तोंडचा खेळ आहे त्यांना कळण्यासाठी आणि या जहाजावर काम करणार्या सर्वांना ही पोस्ट समर्पित 🛳️🚤🛥️⛴️

 ⛴️ जगातील सर्वात मोठ्या जहाजाची अजब कहाणी ⛴️

🔵 जे मुर्ख अस समजतात की नैसर्गिक द्रवरूप वायू आणंण हा तोंडचा खेळ आहे त्यांना कळण्यासाठी आणि या जहाजावर काम करणार्या सर्वांना ही पोस्ट समर्पित 🛳️🚤🛥️⛴️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/04/2026 :

नमस्कार मंडळी,

मी बापा म्हणजेच बाळासाहेब पाटोळे, एक अस्सल कोल्हापूरी, जहाजी विद्युत अभियंता (इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर ETO). 

गेली 29 वर्षे जहाजात काम करतोय.

चला आज थोडं माझ्या या जगातील सर्वात मोठ्या आणि विशेष जहाजाविषयी जाणून घेऊया.

#एम_व्ही_पॅसिफिक_ब्रिझ⚓🚢

#जगातील_सर्वात_मोठे_गॅसवाहक_जहाज

हो अगदी बरोबर वाचत आहात.... हे जगातील सर्वात मोठं असं गॅसवाहक जहाज आहे.

माझ्या जहाजाचे नाव 

#पॅसिफिक_ब्रिझ 

जहाजाची मोजमापं जर लक्षात घेतलीत तर हे किती अफाट आहे ते लक्षात येईल, ही सगळी मापे मीटर मध्ये आहेत बरं का !!! (यातील प्रत्येक मापाला 3 ने गुणलात की ही मापं फुटात होतील)

#जहाजाची_लांबी : 299 मीटर

#जहाजची_रुंदी : 52 मीटर

#जहाजाची_उंची : एकूण 65 मीटर

#जहाजाची_खोली : पाण्याच्या आत 28 मीटर

#एकूण_मजले : 14 मजले (लिफ्ट आहे)

#एकूण_ऑफिसर : 13

#एकूण_कामगार : 22

#इंजिन_पावर : 29600 किलो वॉट (जवळपास 30 मेगा वॉट)

#विद्युत_जनरेटर : 8000 किलो वॅट ची पाच इंजिन (एकूण पावर क्षमता 40 मेगा वॅट)

#स्पीड_कमाल) : 36 किलोमीटर / प्रतितास

ऑफिसर मध्ये आम्ही सगळे 13 जण भारतीय आहोत, तर बाकीचे सर्व कामगार फिलिपिनो आहेत.

माझं जहाज हे एक नैसर्गिक वायू (Natural Gas) वहन करणारे जहाज आहे. ज्याला सर्वजण CNG म्हणून ओळखतात तोच हा Natural Gas. त्याला वायू रूपामध्ये एक विशिष्ठ दाब ठेवून साठवले जाते त्यालाच आपण #Compressed_Natural_Gas (CNG) म्हणतो.

तर हा नैसर्गिक वायू आम्ही द्रव रुपात ऑस्ट्रेलिया हुन तैवान या देशात पोचवत असतो, दर महिन्यात किमान 2 ट्रिप आम्ही तैवानला येतोच येतो.

आमच्या जहाजाची एक वेळी गॅस वहन करण्याची क्षमता....

1 मीटर उंची x 1 मीटर रुंदी x 1 मीटर लांबी = याला 1 घन मीटर म्हणतात हे आपणास माहीत आहेच, या एक घन मीटर मध्ये 1000 लिटर पाणी सामावते.  या एक घन मीटर टन (एक मेट्रिक टन लोड) पाणी म्हणतात.  आम्ही गॅस आणतो तो घनमीटर टन मध्ये मोजला जातो. कारण तो द्रव रुपात असतो.

आणि आम्ही एका वेळी 

1, 82, 000 मेट्रिक टन होय #एक_लाख_ब्याऐंशी_हजार_घनमीटर_टन 

(182000 ला 1000 ने गुणा जो अंक येईल तितके लिटर)

गॅस आम्ही एकावेळी वहन करतो.

जहाजातून नॅचरल गॅस वहन करण्यासाठी दोन प्रकारच्या टाक्या वर्षानुवर्षे प्रचलित आहेत. (सोबतचे फोटो पहा)

#मेम्बरेन_टॅंक

#मॉस_टॅंक

मेम्बरेन टॅंक हे चौकोनी आकाराचे असतात. एका जहाजात 4 ते 5 टॅंक असतात. यात टॅंक मध्ये गॅस भरल्यानंतर वरती अगदी किंचितशी रिकामी जागा शिल्लक राहते त्याचे क्षेत्रफळ टाकीच्या लांबी रुंदीच्या प्रमाणात असते त्यामुळे गॅसचा वरील भाग जास्ती प्रमाणात मोकळा (रिकामा) राहतो आणि त्यामुळे जास्ती प्रमाणात गॅस हा द्रवरूपातुन वायुरूपात आपोआप (जहाज हळण्यामुळे किंवा तापमानातील किंचितसा फरक यामुळे) परावर्तित होतो आणि याचं नियंत्रण प्रमाण हे 0.15 टक्के इतकं असते. 

(उदाहरण म्हणाल तर पसरत भांड्यात पाणी तापवले तर वर असणारे पसरट क्षेत्रातील पाणी भरपूर प्रमाणात वाफ होऊन लवकर निघून जाते)

मॉस टॅंक म्हणजे अगदी बॉल सदृश्य गोलाकार टाकी. असा हा बॉल जर गॅस ने पूर्ण भरत आणला तर अगदी टोकावर गॅस भरून रिकामी राहिलेली जागा ही अगदी कमी क्षेत्रफळाची शिल्लक राहाते आणि ही जागा आहे कमी असल्याने जहाज हलताना ही त्या द्रवरूपी गॅसचे वायुरूपात परावर्तन अगदी नगण्य म्हणजे 0.08 टक्के इतके कमी होते, म्हणजेच मेब्रेन टॅंक पेक्षा निम्म्याने कमी.

आमच्या जहाजात अश्या 40 मीटर (120 फूट) रुंद असलेल्या चार टाक्या आहेत आणि प्रत्येक टाकीत सरासरी 45000 मेट्रिक टन गॅस सामावतो. 

आणि असे *#मॉस_टॅंक_असणारे_व_182000_मेट्रिक_टन गॅस वहन करणारे #आमचे_जहाज_पृथ्वीवर_एकमेव_आहे आणि हे जहाज #आम्ही_भारतीय_ऑफिसर_अगदी_सराईतपणे_आणि_सुरक्षितरीत्या_चालवत_आहोत, आणि त्यात #मी_एकमेव_विद्युत_अभियंता_आहे_हीच_खरी_अभिमानाची_गोष्ट_आहे.* 🇮🇳

आता बघू दुसरे आश्चर्य, 

हा नैसर्गिक वायू पृथ्वीच्या पोटातून काढला जातो तेंव्हा तो वायू रुपात असतो आणि तो वायू रूपातच ठेवला आणि वहन करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मोठी जागा लागणार म्हणून याला द्रव रुपात परावर्तित करावा लागतो आणि त्यासाठी त्याचे तापमान शून्याच्या खाली म्हणजेच #वजा_163_डिगरी_सेल्सिअस इतकं उतरावे लागते म्हणजे तो गॅस द्रावरूपात परावर्तित करून आम्हाला आमच्या जहाजात नेता येतो, हे गॅस थंड करण्याचे एकमेव कारण म्हणजे 600 #लिटर_गॅस जेंव्हा -163 डिगरी वर थंड केला जातो त्यावेळी तो फक्त 1 लिटर द्रव इतकाच होतो.

म्हणजेच 1 लिटर द्रव गॅस चा वायू बनवला तर तो 600 लिटर गॅस होतो,

 याच हिशोबाने पाण्याचं सुद्धा गणित असेच मोठे आहे, तुम्ही जर एक लिटर पाण्याची वाफ केलीत आणि न दाब देता ती वाफ एका एका लिटर च्या कॅन मध्ये भरायला चालू केलेत तर तुम्हाला एकूण 1400 कॅन लागतील, म्हणजेच एक लिटर पाण्यापासून 1400 लिटर वाफ तयार होते .

मग लक्षात घ्या हे तापमान कमी करणे किती गरजेचे आहे, आणि हेच तापमान आम्हाला कायम ठेवावे लागते नाहीतर गॅस वाढत जाऊन इतका प्रचंड दाब तयार होईल की टाकी सहित जहाजाचा स्फोट होऊ शकतो, म्हणून आमचं महत्वाचं काम ते हेच असतं की गॅस चे तापमान वजा 163 हे राहीलच पाहिजे आणि टॅंकचे प्रेशर ही फक्त 25 Kpa च्या आताच राहिले पाहिजे.

जगात सगळ्यात धोकादायक (High Risk Job) नोकरी म्हणून एक नंबर लागतो बॉम्ब निकामी करणाऱ्यांचा आणि दुसरा नंबर लागतो आम्हा गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजी लोकांचा.

जेंव्हा जहाजात गॅस द्रव रुपात भरला जातो त्यावेळी ज्या पाईप मधून गॅस जहाजात भरला जातो त्या पाईप मधील तापमानातील तफावत व घर्षण यामुळे त्या गॅस चा कांही भाग वायू मध्ये परावर्तित होतो, तो गॅस परत आम्ही गॅस भरणाऱ्या पोर्ट कडे दुसऱ्या पाईप मधून पाठवतो. हा गॅस पुन्हा द्रव रुपात परावर्तित केला जातो आणि साठवला जातो. तर कधी कधी अतिरिक्त गॅस हा जाळला ही जातो.

*आता  थोडं आम्हा जहाजी लोकांच्या दिनचर्येबद्दल ......

आम्ही ऑफिसर इथं जहाजात कामावर तीन महिने आणि घरी सुट्टीवर तीन महिने असे चक्र चालू असते, आणि कामगार जहाजात 6 महिने आणि घरी 3 महिने असतात.

आम्ही सर्वजण सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत काम करतो, रोज न चुकता.

आठवड्यात एखादी सुट्टी असते.

सुट्टीच्या दिवशी मग इच्छा असेल तर आमच आवडतं कोल्हापूरी जेवण बनवतो, कधी गाणी म्हणतो, कधी स्केचिंग करतो.

या नोकरीमुळे स्वतः वर भरपूर लक्ष देता येतं, छंद जोपासता येतात.

आणि हो, आपणा साठी पोस्ट ही लिहित असतो.

रोज सायंकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सात पर्यंत आम्ही रिकामे असतो, जर या काळात कांही मशीन बिघाड झालाच तर मग मात्र रात्र दिवस असं कांही बघून चालत नाही, कारण जहाज हे चालूच राहावे लागते आणि त्याचसाठी तर आम्ही जहाजात असतो.

रोजचा दिनक्रम : सकाळी 7:30 ला नास्ता, 10 वाजता चहा ब्रेक ,12 वाजता जेवण, 3 वाजता दुपारचा चहा ब्रेक आणि सायंकाळी 6 वाजता रात्रीच जेवण हा आमचा दिन क्रम

जेवण बनवायला प्रशिक्षित असे दोन कुक असतात, आणि इतर दोन जण जेवण वाढणे, प्लेट साफ करणे व आमच्या रूम साफ करणे यासाठी असतात

मनोरंजन म्हणून दोन सुसज्ज अश्या tv रूम, त्यात सर्व अद्यावत म्युजिक सिस्टम , प्रोजेक्टर , LED tv आहेत, मसाज खुर्च्या आहेत

जहाजात सॅटेलाईट वरून इंटरनेट चालू असते, सगळीकडे WiFi लावले आहेत, पण दर दिवसाला प्रत्येकी 1GB इतका डेटा आठ तासंकरिता दिला जातो,यात घरच्यांशी बोलणं आणि तुमच्यासाठी पोस्ट पाठवणं हे काम आरामात होऊन जाते.

इथं सोबतीला नाहीत म्हणजे फक्त घरचे आणि तुमच्या सारखे मित्र मंडळी,आणि  हेच एक मोठं  आव्हान आणि नाईलाज असणारे दुःख आहे.

काय म्हणता मग, वाचून कळलं का ?? 

आमची नोकरी म्हणजे नुसती मजा नाहीय, आम्ही 24 तास बॉम्ब वरती बसून असतो, आणि म्हणूनच आम्हाला या सोयी दिल्यात, नाही का??

प्रत्येकाला आम्ही घरी असताना वापरणारे भारी भारी कपडे , गाड्या दिसतात पण वर्षातले सहा महिने बॉम्ब वर बसून घरच्यांसाठी तळमळत असतो हे मात्र कोणाला कधी दिसले नाही आणि दिसणार ही नाही.

एक समुद्री अभियंता, अस्सल कोल्हापूरी

#बाळासाहेब_पाटोळे (#बापा)

इलेक्टरो टेक्नो ऑफिसर

शिपिंग कंपनी

टोकियो जपान.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या