भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंढरपूरात अभिवादन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंढरपूरात अभिवादन

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर दि. १४-  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १३५  व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार  समाधान आवताडे,  नगराध्यक्षा प्रणितीताई भालके , प्रांताधिकारी सचिन इथापे, सहा. पोलीस  अधिक्षक प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, उपाध्यक्ष विशाल मांदळे, कार्याध्यक्ष महेश मोटे, नगरपरिषदेचे नगरसेवकयांच्यासह पदाधिकारी, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा प्रणितीताई भालके व प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वज लोकार्पण करण्यात आले. तसेच महाड (जि. रायगड) येथील चवदार तळे येथून पायी आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा प्रणितीताई भालके,  प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांच्यावतीने अभिवादनस्थळी करण्यात आले

               000000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या