सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती  संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/04/2026 : 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक ११/४/२०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी  महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्रेया शिंदे हिने  आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे  यांनी  प्रस्ताविकात सांगितले कि महात्मा फुले यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे. आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेऊन समाजात समता आणि मानवतेची ज्योत पेटती ठेवली पाहिजे. 

यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक, महाविद्यालय समन्वयक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. जयश्री क्षीरसागर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रेरणा कदम  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या