विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/04/2026 :
आपल्याला प्रत्येकाला *आपण यशस्वी व्हावे* , असे वाटत असते. आपण सर्वांपेक्षा सरस असावे, प्रथम क्रमांकाने व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, विविध स्पर्धा जिंकाव्यात, सर्वांनी आपले कौतुक करावे, अशी अनेक स्वप्ने आपण पाहात असतो.
त्यासाठी सर्वप्रथम आपले प्रयत्न गरजेचे असतात. आपल्यापेक्षा गुणवान असणाऱ्यांचे निरीक्षण करायचे, त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवायचा व आपली गुणवत्ता वाढवत राहायची.
मुलांनो, एक लक्षात ठेवा, कुणाशीही स्पर्धा करू नका. कुणावरही वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. तुलना, स्पर्धा करायची असेल तर ती स्वतःशी करा. कुणाचाही हेवा करू नका.
स्वतःमधील गुणवत्ता वाढवा व स्वतःला घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या