मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/04/2026 :
जीवनात आपल्या प्रत्येकाचे काहीतरी ध्येय असते. ते गाठण्यासाठी चिकाटी आणि जिद्द असावी लागते. त्यासाठी कष्ट करणे, सराव करणे किंवा सखोल अभ्यास करून ध्येय प्राप्त करता येते.
अर्थात, यामध्ये आपले पालक, शिक्षक व आपल्या हितचिंतकांचे मार्गदर्शन, आधार आणि मदतीचाही मोठा वाटा असतो. आपल्या यशात अनेक जणांचा सहभाग असतो; ते यश केवळ आपले एकट्याचे कधीच नसते.
यशप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत केली आणि प्रोत्साहन दिले, तर अनेक जण यशस्वी होतील. हे सर्व आपण मनापासून व कर्तव्यभावनेने केले, तर आपल्यालाही मानसिक समाधान मिळेल.
आजचा संकल्प
आपल्याला मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून आपणही इतरांना मदत करू. त्यांची प्रेरणा बनू आणि वातीने वात प्रज्वलित करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या