विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/04/2026 :
आपल्या रोज काही ना काही अडचणी येत असतात. आपण आईकडे तक्रार करतो. मी नाही ती गोष्ट करणार किंवा मी नाही शाळेत जाणार असा हट्ट धरतो.
खरे तर अडचणी आल्यावर खचून न जाता त्यावर मात केली पाहिजे. अडचणीचे रूपांतर संधीत केले पाहिजे. आपले ध्येय गाठण्यासाठी ज्या समस्या असतील त्यांना आव्हान समजून संधी साधली पाहिजे.
मुलांनो, आपली उद्दिष्टे सफल करायची असतील तर प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणे गरजेचे आहे. काल-आज-उद्याचा मेळ घातला पाहिजे. स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवल्या व जिद्द आणि चिकाटीने कष्ट करण्याची तयारी ठेवली तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
मनात आणले तर सामन्यातील सामान्य सुद्धा असामान्य होऊ शकतो.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या