ज्येष्ठ नागरिक संघटना माळशिरस चा स्नेह मेळावा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/04/2026 :
ज्येष्ठ नागरिक संघटना माळशिरस चा स्नेह मेळावा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास माळशिरस येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी संघटनेचे जेष्ठ नागरिक ॲड. भगवान दामोदर धाईंजे यांचा 68 वा वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा सन्मान व अभिष्टचिंतन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ ॲड. प्रभाकर एकनाथ कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दत्तात्रय देशमाने, सचिव मारुती दादा सिद, सल्लागार ॲड. एम एम मगर, कार्यकारिणी सदस्य नंदकुमार गांधी यांचे सह सर्व सभासद, हितचिंतक उपस्थित होते.
याप्रसंगी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा सन्मान ॲड. एम एम मगर यांच्या हस्ते तर सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान नंदकुमार गांधी यांच्या हस्ते आणि यशराज गिरीश शेटे यांचा सन्मान ॲड. भगवान धनंजय यांच्या हस्ते करण्यात आला.


0 टिप्पण्या