मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/04/2026 :
आपले मन असे आहे की, ते मोकळे राहू शकत नाही. सतत काही ना काही विचार चालू असतात. भूतकाळातील अनेक प्रसंग, घटना डोळ्यांपुढे उभ्या राहतात अन् आपण त्यामध्येच गुरफटले जातो.
नकारात्मक वाटणाऱ्या आठवणी आल्या, तर चिडचिड होते. आपल्या मनातही राग, द्वेष, संताप अशा भावना येतात. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते व आपण अस्वस्थ होतो.
अशा वेळी आपण स्वतःमध्ये काही बदल करायचे. चांगल्या गोष्टी आठवण्याची मनाला सवय लावायची. नकारात्मक विचार मनातून काढूनच टाकले, तर सतत ते आठवण्याचा प्रश्न येणार नाही व त्रास होणार नाही.
आजचा संकल्प
मनात सकारात्मक विचार आले की नकारात्मक विचारांना जागा राहणार नाही, याची काळजी घेऊ व वर्तमानकाळ आनंदात व्यतीत करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या