वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/04/2026 :
सर्वसाधारणपणे कोणतीही समस्या निर्माण झाली, तर आपल्याला तिच्यावर काहीतरी *निर्णय* घ्यावा लागतो. समस्या सोडवायची का सोडून द्यायची का थोडी वाट पाहायची, हा निर्णय घेणेही महत्त्वाचे असते.
निर्णय घेताना तो अचूक असणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच तो वेळेवर घेणेही महत्त्वाचे असते. निर्णय योग्य आहे पण तो घ्यायला उशीर झाला, तर *'बैल गेला अन् झोपा केला'* अशी स्थिती होते. त्याच प्रकारे उतावीळपणा करणेही चुकीचे ठरते.
अवघड परिस्थितीत निर्णय घेणे खूप जोखमीचे असते. तो बरोबर ठरला तर सगळे कौतुक करतील, पाठ थोपटतील; पण जर चुकला, तर अपयशाचे खापर तुमच्या माथी असते. अशा वेळी न डगमगता कणखर राहूनच काही निर्णय घ्यावे लागतात.
आजचा संकल्प
समस्या अवघड असो वा नाजूक; भावनिक न होता, सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून त्या प्रसंगी योग्य ठरेल असे निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू व स्वतःला सिद्ध करू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या