विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/04/2026 :

कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणी नावे ठेवलेली आवडत नाही. याचा अर्थ मुलांचे खोटे कौतुक करावे असे नाही. मुलांनी चांगले विचार करावेत, चांगले वागावे-बोलावे असे त्यांना वाटते.

मुलांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. वागण्या-बोलण्याची खरी शिस्त शाळेतच लागते. गोड बोलून, रागावून, वेळ पडली  तर मारून शिक्षक आपल्याला चांगले वागण्याची सक्ती करतात.

मुलांनो, आपले पालक व शिक्षक आपल्याला घडवणारे शिल्पकार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते आपल्यातील अयोग्य सवयींचा आपल्याला त्याग करून चांगल्या सवयी अंगीकारण्यास भाग पडतात.

आई-वडील व शिक्षकांनी केलेले संस्कार अंगिकारू व आपले व्यक्तिमत्व घडवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

===========//=========

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या