"सुख दुःख....! जिथे हक्काने व्यक्त करता येतं.... ते नातं सर्वांग सुंदर असतं"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/04/2026 :
भरले डोळे पुसण्यासाठी, आपलं माणूस लागतं.
आनंदाचा उत्सव करण्यासाठी, आपलं माणूस लागतं.
कौतुकाने पाठ थोपटायला, आपलं माणूस लागतं.
पाठीवर रट्टा द्यायलाही, आपलंच माणूस लागतं.
अशी आपली माणसं, सहजासहजी मिळत नाही,
काळजात प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा, माया असली की, आपलं माणूस भेटतं.
ऑनलाईनच्या जमान्यात, सगळं काही घरपोच मिळतं,
भाजीपाला, किराणा, जेवण एका क्लिकवर घरी येतं,
*एक गोष्ट मात्र कधीही, ऑनलाईन मिळत नाही,
मन मोकळे करायला आपलं माणूस, कधी घरपोच येत नाही,
म्हणूनच पैशांबरोबर आपली माणसं पण जोडायला शिका,
इगो, मतभेद, राग, द्वेष, मत्सर सोडून नात्यांचे अतूट बंध विणायला शिका,
नातं टिकवायला कधीतरी, कमीपणा हा घ्यावाच लागतो,
नात्यांच्या श्रीमंतीनेच, माणूस खरा श्रीमंत होतो,
आपली माणसं जोडणं, खरंच इतकं काही अवघड नाही,
थोडासा दुसऱ्याचा विचार केला, तर नातं कधीही तुटत नाही,
सहजच केलेला फोन, खरंच खूप आनंद देऊन जातो,
धावती जरी भेट दिली तरी, आपला माणूस सुखावतो,
एकटं एकटं जगण्यात, खरं सांगा बरं काय मजा आहे,
परिवारा पेक्षा श्रेष्ठ पैसा नाही.
वडीलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही.
आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही.
भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही.
बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही.
मित्रांशिवाय आयुष्य नाही.
म्हणून परिवार शिवाय जिवन नाही.
आपलं माणूस सोबत नसेल, तर जीवन जगणं सजा आहे.
आपलं माणूस सोबत असलं की, नैराश्य दूर पळतं,
आपल्या माणसांमुळेच, आपलं आयुष्य सुंदर बनतं.
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
संकलन : प्रविण सरवदे, कराड,
====================

0 टिप्पण्या