मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/04/2026 :

आपण पालक या भूमिकेत असताना काही गोष्टींची पथ्ये पाळली पाहिजेत. मुलांना शिस्त लावणे, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवणे ठीक; पण त्याच वेळी जबाबदार पालक म्हणून आपलीही काही कर्तव्ये असतात.

आपल्या स्वतःच्या मुलांची एकमेकांशी किंवा बाहेरील मुलांशी कधीच तुलना करायची नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. शालेय परीक्षेत मिळालेले गुण म्हणजेच हुशार असणे, असे नसते.

मुलांच्या केवळ गुणपत्रिकेवरच त्यांचे भविष्य घडणार असते असे नाही. शालेय जीवनात जास्त न चमकलेली मुलेसुद्धा पुढे जाऊन खूप यशस्वी होतात. त्यामुळे त्यांच्यावर आपली मते लादणेही योग्य नाही.

 आजचा संकल्प

शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारज्ञान वाढवणेही गरजेचे आहे, हे आपल्या मुलांच्या लक्षात आणून देऊ व त्यांचे करिअर घडवण्यासाठी त्यांना पाठिंबा आणि प्रेरणा देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या