विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/04/2026 :

मित्र परिवारात वावरताना चेष्टा-मस्करी चालते. एकमेकांची फिरकी घेतली जाते. कधी कधी चेष्टा जिव्हारी लागते. मित्रांच्यात अपमान वाटतो. वादविवाद होतात क्वचित मैत्री तुटते.

अशा वेळेस प्रत्येकानेच काही मर्यादा पाळणे गरजेचे असते. चेष्टा करताना हलकीफुलकी असावी. जास्त ताणू नये. एकमेकांना समजून घ्यावे. अन्यथा एकदा गैरसमज झाले, संबंध तुटले की पुन्हा जुळले जात नाहीत.

मुलांनो, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर थोड्यावेळपुरते तिथून बाहेर पडा. वातावरण शांत झाल्यावर तुमचे मत सांगा पण त्याला भांडणाचे स्वरूप देऊ नका.

नाजूक वस्तू काळजीपूर्वक हाताळतो तशी मैत्री जपा.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या