वारकरी संप्रदायात नक्कीच विचार बदललेत

 वारकरी संप्रदायात नक्कीच विचार बदललेत

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/04/2026 :

आपला भारत देश. अनेक भाषा, धर्म, पंथ, जाती जमातीचे सर्व लोक या देशात राहतात. म्हणून आपल्या देशाला साधुसंतांचा देश , ऋषीवर्यांचा देश म्हणून पाहिलं जातं. त्यातच महाराष्ट्र राज्य हे तर संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या महाराष्ट्रात संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज , संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज ,संत चोखा महाराज, संत सेना महाराज ,संत शेख महंमद, संत लतीफ मुसलमान, संत कबीर ,संत सखु, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, अशा सर्व संतांनी या महाराष्ट्राला या विश्वात नाही एवढं महत्त्व दिलेला आहे.  संत नामदेव महाराजांनी तर १२८९ साली आम्हा सापडले वर्म| करू भागवत धर्म॥ म्हणून सर्व पुरोगामी विचाराचं आणि संत विचाराचा मिश्रण करून देव हा दगडधोंड्यात नसून किंवा तंत्र मंत्रात नसून तो नामस्मरणात आहे हे विधान त्यांनी पटवून दिल  म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये सर्वधर्मसमभाव, स्वातंत्र्य ,समता, बंधुता ही विचारसरणी संताच्या विचारात निर्माण झाली .आणि या संत साहित्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून संत साहित्य लेखणीतून संविधान निर्मिती झाली. मुळात संताने वारकरी संप्रदायांमध्ये जात या शब्दाला मान्य केलेलं नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ॥ किंवा या रे या रे लहान थोर| याती भलती नारी नर॥ किंवा चहु वर्णास नामाधिकार| नामी नाही लहान थोर |जडमूड पैल पार| पावती नामे॥ अशा विचाराने हा महाराष्ट्र जातीविरहित वारकरी संप्रदाय घडवला पण अलीकडच्या काळात नक्कीच बदल झाल्याचं जाणवतं म्हणून सर्व संत   बहुजनातीलच आहेत . कारण  संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज व संत तुकाराम  महाराज या तिन्ही संतांच्या विचारांमध्ये कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही, कर्मकांडाला महत्व नाही. फक्त रामकृष्णहरी, पंढरीची वारी ,चांगलं वागणं, चांगल बोलणं, खरे बोलणे व गळ्यात तुळशीची माळ या विचारावर त्यांनी महाराष्ट्र घडवला. पण 2016 या कालावधीपासून या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण करून वास्तविक पाहता राजकारणामधे पक्षाची आघाडी करणे  हे योग्य नाही कारण आत्तापर्यंतच्या या कालावधीमध्ये राजकारणामध्ये कोणीही अध्यात्मची आघाडी केलेली नाही. पण परमार्थिक क्षेत्रामध्ये आणि या वारकरी संप्रदाय मध्ये राजकीय विचाराची जडणघडण करून या ठिकाणी  आर्थिक प्रलोभन दाखवली गेली आणि बरेचसे वारकरी संप्रदायातील लोक प्रलोभनाला बळी पडून संप्रदायामध्ये राजकीय खेळी चालू झाली. त्यातच रामकृष्ण हरी या शब्दाऐवजी जय श्रीराम या शब्दाला वेगळे वळण दिलं. या ठिकाणी वारकरी संप्रदाय मध्ये कोण म्हणतं की विचार बदलले नाहीत नक्कीच विचार बदलले, अनेक वेगळ्या रूढी चालू झाल्या. वारकरी संप्रदाय मध्ये होम हवन तंत्र मंत्र विद्या काळी विद्या अशा प्रकारास मान्य केले नाही. तुशार भोसले आपले महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपले महत्त्व काय किंवा देशाच्या विकासात्मक धोरणामध्ये किंवा जडणघडणीमध्ये आपलं महत्त्व काय तसेच वारकरी संप्रदायामध्ये आपण कोणतं काम केलं आहे की वारकरी संप्रदाय मध्ये आपण कोणतं कार्य केला आहे की आपण वारकरी संप्रदायामध्ये आर्थिक प्रलोभनाचा वापर करून वारकरी संप्रदाय राजकीय दिशेने वाहक चालवला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला राजकीय महत्त्व प्राप्त होऊन त्यामध्ये अध्यात्मिक सांप्रदायिक विचाराला कुठेतरी तिलांजली देण्याचा आपण प्रघात चालू केला आहे असे वाटत नाही का?ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या विकासात आमूलाग्र बदल घडवला. सहकार क्षेत्राचा पाया भक्कम केला. देशातील शेतकरी मजबूत बनवला आचार्य  पदविला शोभेल अशी मुखातील वाणी असावी. वयोमानानुसार एखाद्या देशपातळीवरील महान कार्य करणाऱ्या कर्तृत्वाला इतक्या खालच्या पातळीवरून बोलणे म्हणजे आपल्या आचार्य पदवीचा आपणच आपला अपमान केल्यासारखे वाटत नाही का?संत ज्ञानदेवादी चार भावंडाना जगणे कोणी मुश्किल केल ?शुद्धीपत्र कोणी नाकारल? संत चोखोबांचा छळ कोणी केला? संत तकाराम महाराजांना तर त्रास इतका दिला की त्याचे वर्णन करणे कठीण आणि तुषार  भोसले आपण नेमके त्याच रस्त्याने सांप्रदाय घेवून चाललात असे वाटत नाही का? टीकात्मक व शिवराळ प्रसिद्धि मिळवता आहात हे बरोबर नाही. राम कृष्ण हरी.

                ह.भ.प.मोहनानंद महाराज पुरंदावडेकर

                             राष्ट्रीय कीर्तनकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या