विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/04/2026 :

आपल्याला पक्षी पाहायला, त्यांचा किलकिलाट ऐकायला आवडते. दारात येणाऱ्या काही पक्ष्यांव्यतिरिक्त जास्तीचे पक्षी पाहायला मिळाले की किती आनंद होतो! पिसारा फुलवलेला मोर तर आपल्याला वेड लावतो.

सध्या उन्हाळा खूप आहे. तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने सर्वांची काहिली होत आहे. कितीही पाणी प्यालो तरी तहान भागत नाही; घशाला कोरड पडते. भरपूर काळजी घेऊनही कितीतरी जणांना उष्माघात होतो.

मुलांनो, अशा परिस्थितीत पक्ष्यांचे किती हाल होत असतील, याची कल्पना करा. प्राणी-पक्षी यांना उन्हापासून वाचवण्यासाठी काहीतरी करावे, असे तुम्हाला वाटते का? दारात किंवा टेरेसवर आठवणीने पाण्याची भांडी ठेवा, धान्य ठेवा.

पाण्यावाचून कोणताच प्राणी जगू शकत नाही. त्यांचा जीव जपा, त्यांची काळजी घ्या!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या