प्राणी सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा - संजय वाघमोडे
वृत्त एकसत्ता न्यूज
कोल्हापूर : प्राणी सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्य व पशुहानी ची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. कोल्हापूर येथे गेस्ट हाऊस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित यशवंत क्रांती संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांचे हस्ते पुतळा पूजन झाले. बैठकीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
बैठकीमध्ये संघटनेच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला व समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व खालील प्रमाणे ठराव करण्यात आले. प्राणी सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मनुष्य व पशुची नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित करून त्यांची नुकसान भरपाई वारसदार, पशुपालक मेंढपाळ, यांना शासना कडून देण्यात यावी. दुर्गम भागातील धनगरवाड्यांकडे जाणारे रस्ते काही ठिकाणी हेतुपुरस्सर अडवण्यात आले असल्याने ते त्वरित खुले करण्यात यावेत, व ज्या ठिकाणी रस्ते नाहीत अशा ठिकाणी तातडीने रस्ते तयार करण्यात यावेत. संघटनेची अनेक वर्षांपासून असणारी मागणी म्हणजे दुर्गम भागातील धनगर वाड्यावर आरोग्य दुत नेमण्यात यावेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने हि योजना फायदेशीर असुन यासारखी दुसरी योजना नाही असे शासनाकडे कळवूनही ही योजना लालफितीत अडकून पडली आहे. या योजनेस तातडीने मंजूरी द्यावी. कोल्हापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी महामंडळ प्रक्षेत्र सुरू करून कोल्हापूरी / दख्खन मेंढी नष्ट होत चालली आहे. तेचे संशोधन व संवर्धन करण्यात यावे. धनगर वाड्यावरील मराठी शाळा बंद करण्यात येऊ नयेत. इत्यादी ठराव बैठकीत करण्यात आले. शेळी- मेंढी साठी शासनाने विमा योजना सुरू करावी. राज्यातील मेंढपाळ नोंदणी करुन मेंढपाळांना ओळखपत्रे देण्यात यावीत.. संघटनेची सभासद नोंदणी अधिक प्रभावी करून सभासदांना विमा संरक्षण देण्याबाबतही ठराव करण्यात आला. इ. ठराव मंजूर करण्यात आले. तसेच संघटनेच्या पुढील ध्येय-धोरणांच्या दिशेने वाटचाल कशी असावी यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे विश्वासू व सक्रिय पदाधिकारी गंगाराम तुकाराम बोडके (युवक अध्यक्ष, राधानगरी तालुका)यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील विठ्ठल शेळके (जिल्हा संपर्कप्रमुख), हेमंत बोडके (जिल्हाध्यक्ष), दादासो गावडे (जिल्हा उपाध्यक्ष)सुनील शेळके कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख, हेमंत बोडके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, दादासो गावडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, अरूण फोंडे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष, सुभाष वगरे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष, यशवंत वाकसे हातकणंगले तालुका अध्यक्ष, अमोल सिसाळ हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष, केर्ली शाखेचे बाबासो माने, बाबुराव माने, राजाराम माने, जगन्नाथ केरबा माने, सरदार भिकाजी माने, बाळू बिरू माने, (शाहीर ) गंगाराम तुकाराम बोडके , ज्ञानदेव धोंडीराम फाले, विठ्ठल दगडू फाले, रघुनाथ रामचंद्र झोरे, विक्रम धोंडीराम झोरे, सावन सिताराम सोनवणे, मिणचे शाखा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

0 टिप्पण्या