विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/04/2026 :

आपल्याला नवनवीन गोष्टी करायला आवडतात. नवीन वस्तू वापरायला आवडतात. नवी फॅशन आली की, जुन्या गोष्टी अडगळीत पडतात; त्यांच्याविषयीचे आकर्षण कमी होते.

अशा वस्तू वापरताना किंवा वापरून झाल्यावर त्यांच्यातील तकलादूपणा जाणवतो, तेव्हा जुन्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच आपण 'नवे ते हवे, पण जुने ते सोने' असे म्हणतो.

मुलांनो, व्यक्तींच्या बाबतीतही हेच लक्षात घेऊया. आपण जसजसे वरच्या वर्गात जाऊ, शाळेतून महाविद्यालयात जाऊ, तसे मित्र बदलतात, शिक्षक बदलतात; पण म्हणून जुन्यांना विसरायचे नाही. त्यांचेही आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या