मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/04/2026 :
पूर्वीपासून मनुष्याला एकटे रहायला आवडत नाही. तो गटा गटाने राहतो, समूहात राहतो व सुरक्षित राहतो. यामधूनच एकत्र कुटुंब पद्धती, वस्ती, गावे, नगरे असे वसत गेले. माणसांना समाजात सर्वांबरोबर रहायला आवडते.
काळ थोडासा बदलला आणि कुटुंबे विभक्त झाली. हळू हळू चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबे झाली. स्वतंत्र आलिशान घरात फर्निचर भरपूर आले पण आई-वडील किंवा बहिण-भावांना जागा नाही अशी स्थिती झाली.
खरे तर आपल्या लोकांनी आपले वैभव पहावे, उपभोगावे. रक्ताच्या नात्यांची माणसे सोबत असतीलच पण जोडलेली, मैत्रीच्या नात्याची माणसे सुद्धा सोबत असावीत. आपली माणसे आपल्या सोबत असणे ही खूप मोठी श्रीमंती असते.
आजचा संकल्प
जीवनात अनेकांचा सहवास लाभणे, मायेचा ओलावा मिळणे ही खूप मोठी श्रीमंती आहे. ती जपण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करत राहू व मानसिक आनंद मिळवू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या