विचारधारा

 

विचारधारा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्कय

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/04/2026 : निसर्ग कधी भेद भाव करत नाही. कधी आपले-परके मानत नाही. निसर्गापुढे सर्वजण समान असतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते.

तुम्ही जे पेराल तेच उगवते. आंब्याची कोय लावली अन् बाभळीचे झाड उगवले असे कधीच होत नाही. त्यामुळे आपण नेहमी चांगली कर्मे करत रहावीत म्हणजे आयुष्यात दुःखाचे क्षण कमी येतील.

मुलांनो, चांगली कर्मे करणे तसे फार अवघड नाही. मनात सकारात्मक विचार असतील तर आपल्याकडून योग्यच वर्तन होईल. आणि सर्वात महत्वाचे ठरवून चांगले वागता आले नाही तरी कमीतकमी वाईट वागले नाही म्हणजे झाले.

कोणाचे चांगले करता आले नाही तरी निदान वाईट तरी करू नका.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या