डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जर्मनीतुन खरेदी केलेले लाखमोलाचे दुर्मिळ घड्याळ

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/04/2026 : 

 बाबासाहेब स्वतःच एक स्टाईल आयकॉन आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारची चष्म्याच्या फ्रेम्स, फाऊंटन पेन, घड्याळ, काठी, सूट, शूज इत्यादी वापरत असत. फोटो जे दिसत आहेत, त्यात एक सुंदर चैन वाले घड्याळ आहे. ते घड्याळ बाबासाहेब आपल्या कोटाच्या खिशात ठेवत असत. त्या घड्याळाकडे झूम करून नीट बघितले तर आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची आद्याक्षरे इंग्रजी भाषेत ठळकपणे B R A म्हणजेच Bhimrao Ramaji Ambedkar आहेत, हे आपणास लक्षात येते. ते त्यांनी जर्मनी येथूनच छापून घेतली आहेत. हे दुर्मिळ घड्याळ बाबासाहेब यांनी ते जेव्हा जर्मनीच्या बॉन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशासाठी गेले होते, तेव्हा जर्मनी मधून खरेदी केले होते. सध्या हे घड्याळ वराळे कुटुंबिया कडे संग्रही आहे. जो फाऊंटन पेन आहे तो सुद्धा बाबासाहेब यांनी जर्मनीहुन आणलेला आहे. या पेनाने त्यांनी भारतीय राज्यघटनेचा काही मसुदा लिहिलेला आहे.

Post : श्रीधर वाघमारे

मुख्य सोर्स : सुनील लोणकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या