विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/04/2026 :

शाळेत वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. वेळापत्रक देऊन परीक्षा घेतात, तशा त्या अचानकही घेतल्या जातात. तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक, मैदानी अशा वेगवेगळ्या परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते.

सर्वसाधारणपणे 'परीक्षा' म्हटले की, मनावर एक वेगळाच ताण येतो. थोडी भीती वाटते. कितीही अभ्यास केला तरी ऐन वेळी विसरल्यासारखे होते, आठवतच नाही; असे अनुभव प्रत्येकालाच येतात.

मुलांनो, परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहा. दिलेल्या अभ्यासक्रमातील आपल्याला किती समजले, म्हणजे परीक्षेत मिळालेले गुण; आणि जितके गुण कमी पडले, तितके आपल्याला समजले नाही, असा त्याचा अर्थ होतो.

आपल्याला नेमके काय व किती समजले नाही, हे समजण्यासाठी परीक्षा असतात. मनापासून अभ्यास केला, तर जास्तीत जास्त गोष्टी समजतात.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या