मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 09/04/2026 :
आनंद-दुःख हे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपल्या मानण्यावर ते अवलंबून असतात. एखादी घटना एकाला आनंद देईल तर तीच घटना दुसऱ्याला दुखी करेल.
एखाद्याच्या जीवनात घडलेली चांगली गोष्ट त्याला आनंद देत असली तरी त्यामुळे दुसऱ्याला वाईट वाटते. जे त्याला मिळाले ते मला नाही म्हणून तो दुखी होतो.
सुख-दुःख हे मृगजळ आहे. ती केवळ एक विधिलिखित घटना असते. त्याबद्दल तुम्हाला आपुलकी वाटली, आस्था वाटली तर ती सुखदायी,आनंददायी वाटेल. याउलट त्या घटनेबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया असतील तर दुःख होईल.
आजचा संकल्प
कोणतीही घटना व तिचे परिणाम आपल्या मानसिकतेनुसार व दृष्टिकोनानुसार आपल्याला भावते. सुख-दुःख या भावनिक गोंधळात न गुंतता सम्यक दृष्टीने पाहू व जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप
=================

0 टिप्पण्या