विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/04/2026 :
आपल्यातील परस्पर कृतींना आपण 'प्रतिसाद' देतो. अगदी कुणी गोष्ट सांगत असेल तेव्हा सुद्धा ऐकणारा प्रतिसाद देतो. तो प्रतिसाद मिळाला की सांगणाऱ्याचा उत्साह वाढतो.
प्रतिसाद सकारात्मक असतो तेव्हा त्यामधून ऊर्जा मिळते, उत्साह वाढतो, प्रेरणा मिळते. मात्र तोच प्रतिसाद जर नकारात्मक असेल, त्यातून गैरसमज निर्माण होत असतील तर त्यातून वितुष्ट वाढते.
मुलांनो, *'आरे ला कारे'* करणारा प्रतिसाद नको. समोरच्याला समजून घ्या. चुकत असेल तर त्याला सुधारण्यासाठी थोडा वेळ द्या. समजदारपणा ठेवला तर नको ती वेळ येणार नाही. एक तापला तर दुसऱ्याने शांत राहावे.
नकारात्मक प्रतिक्रिया टाळली तर परस्पर संबंध चांगले राहतील.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या