सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभ संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/04/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० एप्रिल२०२५ रोजी मेकॅनिकल विभागाच्या डिप्लोमा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले.
“मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही आयुष्यात निश्चित यश संपादन कराल,” असे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी सांगितले.
मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. स्वप्नील निकम यांनी विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. तसेच प्रा. संजय झंजे, प्रा.शुभम धनवले, प्रा. ओंकार मिले व वरिष्ठ क्लर्क मीनाक्षी राउत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मेकॅनिकल विभागातील प्रथमवर्षातील विद्यार्थिनी कु. श्रेया शिंदे व द्वितीय वर्षातील कु. लक्ष्मी चोपडे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. शुभम धनवले व विद्यार्थी समन्वयक रोहन कौलगे यांनी काम पाहिले.
×××××××××××××××××××××××××××××××××××××××

0 टिप्पण्या