मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/04/2026 :
दोन व्यक्तींमधील वाद त्या दोघांच्यापुरता राहत नाही. रागाच्या भरात अपशब्द वापरले जातात, ज्याचा कुटुंबावर आणि परस्परांमधील नात्यावर परिणाम होतो. यामुळे इतरांची मने कलुषित होतात आणि दुखावली जातात.
यामध्ये 'चूक कोण आणि बरोबर कोण' हा मुद्दा बाजूला पडतो. कोण काय म्हणाले, काय अपशब्द वापरले किंवा कसा दोष दिला, याच गोष्टी बराच काळ मनात घर करून राहतात आणि त्यातून मानसिकता बिघडते. पर्यायाने समाजासमोर हसू होते.
खरे तर कालांतराने पुन्हा सगळे 'जैसे थे' होते, संबंध सुरळीत होतात; पण तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी एक अढी राहतेच. अपशब्द सहजासहजी मनातून जात नाहीत. त्यासाठीच बोलताना नेहमी विचारपूर्वक शब्द वापरावेत.
आजचा संकल्प
कितीही राग आला तरी समोरची व्यक्ती आपलीच आहे, याचे भान ठेवू. रागावर व भाषेवर नियंत्रण ठेवून गैरसमज दूर करू आणि एकमेकांची मने जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप

1 टिप्पण्या
अतिशय छान लेख आहे
उत्तर द्याहटवा