शंकरनगर येथे संत गोरोबाकाका व स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी साजरी.

 

शंकरनगर येथे संत गोरोबाकाका व स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी साजरी.

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/04/2026 :

शंकरनगर-अकलूज येथे कुंभार समाजाच्या वतीने संत श्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांची व अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली.                                      

यानिमित्ताने संत श्रेष्ठ गोरोबाकाका महाराज व अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ओंकार चंद्रकांत कुंभार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शितल ओंकार कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिलीप स्वामी यांनी  स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराविषयी आणि संत गोरोबा काकांच्या विठ्ठल भक्तीविषयी माहिती सांगितली. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात येऊन आरती व नामजप झालेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामा कुंभार,संजय हावळे,गणेश कुंभार,सुरज कुंभार, संदीप कुंभार,दिपक कुंभार, अरुण तोरणे,अमर तोरणे,शरद एकतपुरे, तुकाराम जाधव, भुईकर यांचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या