संतोष माळी यांची भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड

 


संतोष  माळी यांची भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड 

वृत्त एकसत्ता न्यूज

पेठ वडगाव/ अनिल पाटील दि.1/4/2026

भाजपा युवा मोर्चाच्या कोल्हापूर जिल्हा निवडीमध्ये पेठ वडगाव चे सामाजिक कार्यकर्ते संतोष उर्फ बंडा माळी यांची भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

ही निवड भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली या निवडीसाठी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवडे भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर भाजपा कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या