🟨 बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

🟨 बिबट्याच्या  हल्ल्यात शेळी ठार

वृत्त एकसत्ता न्यूज 

भुयेवाडी प्रतिनिधी  दिनांक 11/04/2026 : बिबट्या सदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात  रघुनाथ हजारे या मेंढपाळाची १ शेळी ठार व १ जखमी झाली आहे.  शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे  मेंढपाळास अंदाजे ४० हजार रुपयाचा अर्थिक फटका बसला आहे. 

     याबाबत सविस्तर माहिती अशी कि भुयेवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील मेंढपाळ रघुनाथ पांडुरंग हजारे, भारत लखन हराळे, आप्पाजी विलास हराळे, जयवंत बाबूराव अष्टेकर, या मेंढपाळांच्या सुमारे ३०० शेळ्या-मेंढरांचा कळप खतासाठी यशवंत मारूती पाटील रा. भुयेवाडी, यांच्या ( गुरवकी ) शेतात  बसायला आहेत. 

        शनिवार दि. ११/४/२०२६ रोजी पहाटेच्या  सुमारास  बिबट्या सदृश्य  वन्यप्राण्यांनी  मेंढरांच्या कळपावर  हल्ला केला. कुत्र्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले. तेव्हा बिबट्या सदृश्य वन्यप्राणी शेळ्यावर हल्ला करत होते. मेंढपाळ यांनी आरडाओरडा करून वन्यप्राण्यांना पिटाळून लावून शेळ्यांना त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले. परंतु   शेळ्या गंभीर जखमी झाल्या.   

   जखमी शेळ्यांवर डॉ. वुणवणे पशुधन विकास अधिकारी भुयेवाडी यांनी उपचार सुरू केले. परंतु उपचारा- दरम्यान एका शेळीचा मृत्यू झाला. 

     भुयेवाडी, कासारवाडी, शिये, अंबप या परिसरात बिबट्या तरस गवे यांची दहशत कायमचीच आहे.  याच भुयेवाडीत गव्याच्या हल्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.  वन्यप्राण्यांची दहशत या परिसरात  निर्माण झाली आहे वनविभागाने या भागातील प्राणी पकडून घनदाट जंगलात सोडून द्यावे. किंवा पाळीव हत्ती अंबानी घेऊन जात आहे त्याप्रमाणे यापरिसरात त्रासदायक ठरणारे वन्यप्राणी पकडून अंबानीनी घेऊन जावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. व शासनाने प्राणी सुरक्षा कायदा रद्द करावा. अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. घटना स्थळी यशवंत क्रांती चे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ (हामु ), पाटील, मच्छिंद्र बिडगर ,  वाल्मीक बिडगर , भाऊसाहेब हलवर, ग्रा. सदस्य संभाजी खोत, सरपंच सचिन देवकुळे, संभाजी हजारे,भगवान हजारे, भारत हराळे, आप्पाजी हराळे जयवंत अष्टेकर, इ. शेतकरी मेंढपाळ  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या