मनाची शुद्धता

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 9/4/2026 : 

दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे येतात की कोणाची तरी आपल्याला "भीती" वाटते. काही प्रसंगांना आपण घाबरतो. त्यांना सामोरे जाणे भीतीदायक असते. अगदी शालेय परीक्षा जवळ आली तरी आपल्याला भीती वाटते.

घाबरल्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते. मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो. साहजिकच शारीरिक आरोग्यावर पण त्याचा दुष्परिणाम होतो. अर्थात कधी कधी भीतीपोटी चांगली कामे केली जातात.

शिक्षा होईल या भीतीने शाळेत वेळेत जाणे, नापास होण्याच्या भीतीने अभ्यास करणे, नोकरी जाईल या भीतीने चांगले काम करणे वगैरे. यामधून एक गोष्ट लक्षात येते की भीतीचा सकारात्मक परिणाम पण अनुभवता येतो.

आजचा संकल्प

भीती वाटणे ही मानसिकता सकारात्मक बाजूने वळवली तर निश्चितच त्याचे नकारात्मक परिणाम न दिसता आपल्यात सुधारणा होईल हे लक्षात घेऊ व स्वतःला घडवू.

सौ. स्नेहलता स. जगताप


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या