9 एप्रिल रोजी सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मॉक टेस्टचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/04/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी मॉक टेस्टचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.टी.- सी.ई.टी.च्या परीक्षेची उजळणी व सॉफ्टवेअर ची माहिती व त्याचबरोबर परीक्षेस कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभावे या उद्धेशाने सर्व विभागाचे विभाग प्रमुखांचे मार्गदर्शनाखाली
मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा.एस. एस. शिंदे (८०८७७०६६९०) व प्रा. एस. एस. पांढरे(९७६७२००३७९) यांच्याशी संपर्क साधावा.

0 टिप्पण्या